Polycystic Ovary Syndrome (PCOS)
"पॉलीसिस्टिक ओवरी सिन्ड्रोम" हा प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आणि तरुण मुलींमध्ये आढळून येणारा आजार आहे. हा आजार स्त्रियांमधल्या लैंगिक अवयवांमध्ये बदल घडवून आणतो, तर पाहूया थोड्यक्यात या आजाराबद्दल.
अंडाशय(ovary) गर्भाशय (uterus)आणि ह्या दोघांना जोडणारी फेलोपियन नलिका तसंच योनी (vagina )हे स्त्रियांमधले महत्वाचे अवयव असतात.
स्त्रियांच्या अंडाशयात असंख्य अफलित eggs असतात ज्यांना शास्त्रीय भाषेत फॉलिकल असं म्हणतात
मानवी मेंदूच्या खालच्या भागाजवळ असलेल्या "पिट्युटरी ग्रंथी "या FSH आणि LH नावाची स्त्री संप्रेरके (फिमेल हॉर्मोन्स ) ची निर्मिती करतात आणि तयार झालेले हे हॉर्मोन्स रक्तनलिकांमार्फत अंडाशयात प्रवेश करतात
इस्ट्रोजेन च्या निर्मितीमुळे फलित egg (फॉलिकल ) अंडाशयातून बाहेर पडून फेललोपिअन नलिकेमधून प्रवास करतात आणि मासिक पाळीद्वारे दर महिना शरीराबाहेर पडतात आणि उरलेले eggs अंडाशयात विरघळून जातात.
जर स्त्रियांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत असेल तर मासिक पाळी वेळेत येऊन वेळेत जाते.
"PCOS" या आजारामध्ये मानवी मेंदू च्या खालील बाजूस असलेल्या पिट्युटरी ग्रंथी प्रमाणापेक्षा जास्त LH आणि FSH हॉर्मोन्स ची निर्मिती करतात. ज्यामुळे अंडाशयात एकही egg फलित होत नाही आणि eggs विरघळण्याऐवजी त्यांचे पाण्याने भरलेल्या पिशवीत रूपान्तर होते ज्याला शास्त्रीय भाषेत "Cyst" (सिस्ट ) असं म्हणतात.
याच दरम्यान स्वादुपिंडातून इन्सुलिन ची निर्मिती होते आणि ते रक्तनलिकांमधून अंडाशयात प्रवेश करतात ज्यामुळे अंडाशयात टेस्टेस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाची (मेल हॉर्मोन्स) ची निर्मिती होते आणि याचकारणाने एकही egg फलित न होता अफलितच राहतात आणि अंडाशयातून बाहेर पडू शकत नाहीत. आणि म्हणून स्त्रियांची मासिक पाळी लांबणीवर जाते किंवा त्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात.
PCOS ची प्रमुख लक्षणं -
* वजनात झालेली वाढ
* मोठ्या प्रमाणात केस गळती होणे
* मासिक पाळी 2 3 महिने उशिरा येणे
* झोप न लागणे.
PCOS वर अद्यापही उपचार नाहीत. परंतु नियमित व्यायाम, योगा, चांगला आहार यांमुळे स्त्रिया या आजारावर मात करू शकतात.
बर्याचश्या स्त्रियांना या आजाराबद्दल अद्याप जास्त माहिती नाही. त्यामुळे यामागचा एकच उद्देश असा की लवकरात लवकर या आजाराबाबत स्त्रियांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी.
वरील पैकी कोणतीही लक्षण आढळ्यास त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही विनंती.
- उन्मेश दत्तात्रय साळस्कर.