Posts

Pneumonia ( निमोनिया )

Image
                                  निमोनिया  आपण पहिल्या लेखाबद्दल दिलेल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.. !! आज आपण बघणार आहोत असा आजार ज्याने सध्याच्या कोविड -19 च्या भयावह परिस्थितीत डोकं वर काढलं होतं आणि तो आजार म्हणजेच 'निमोनिया.'बऱ्याच लोकांना या आजाराबाबत ठाऊक असेल पण तरी आपण अगदी सोप्या सहज भाषेत या आजाराचा जवळून आढावा घेऊ..त्याचप्रमाणे निमोनिया आणि कोरोना वायरस ह्यांचा कसा एकमेकांशी संबंध येतो तेही पाहूया.. !! निमोनिया हा आजार प्रामुख्याने मानवी 'lungs ' म्हणजे फुफुसांमध्यें होणारा आजार आहे. आपल्या श्वसनप्रक्रियेमध्ये फुफुसे अतिशय महत्वाचे असतात.. अगदी केंद्रबिंदू म्हटलं तरी चालेल.  श्वसनप्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 3 अवयवांचा उपयोग अतिशय महत्वाचा असतो. सगळ्यात प्रथम (1)श्वसननलिकेमार्फत म्हणजेच 'ट्रॅकिया' मार्फत बाहेरचा ऑक्सिजन आत घेतला जातो. श्वाननलिकेला पुढे दोन छोट्या नलिका जोडलेल्या असतात ज्या एकमेकांच्या विरुद्ध दीशेला असतात ज्यांना (2)' ब्रॉंचाय 'असं म्ह...

Polycystic Ovary Syndrome (PCOS)

Image
"पॉलीसिस्टिक ओवरी सिन्ड्रोम" हा प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आणि तरुण मुलींमध्ये आढळून येणारा आजार आहे. हा आजार स्त्रियांमधल्या लैंगिक अवयवांमध्ये बदल घडवून आणतो, तर पाहूया थोड्यक्यात या आजाराबद्दल.  अंडाशय(ovary) गर्भाशय (uterus)आणि ह्या दोघांना जोडणारी फेलोपियन नलिका तसंच योनी (vagina )हे स्त्रियांमधले महत्वाचे अवयव असतात.  स्त्रियांच्या अंडाशयात असंख्य अफलित eggs असतात ज्यांना शास्त्रीय भाषेत फॉलिकल असं म्हणतात  मानवी मेंदूच्या खालच्या भागाजवळ असलेल्या "पिट्युटरी ग्रंथी "या FSH आणि LH नावाची स्त्री संप्रेरके (फिमेल हॉर्मोन्स ) ची निर्मिती करतात आणि तयार झालेले हे हॉर्मोन्स रक्तनलिकांमार्फत अंडाशयात प्रवेश करतात  अंडाशयात प्रवेश केल्यानंतर LH आणि FSH अफलितलं eggs चे रूपांतर फलित eggs मध्ये करतात. फलित eggs आणखी एका महत्वाच्या फिमेल हॉर्मोन्स ची म्हणजेच "इस्ट्रोजेन"ची निर्मिती करतात.  इस्ट्रोजेन च्या निर्मितीमुळे फलित egg (फॉलिकल ) अंडाशयातून बाहेर पडून फेललोपिअन नलिकेमधून प्रवास करतात आणि मासिक प...